धुळे । देवपूर बसस्टॅण्डवरून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे नेतांना एका तरूणास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी देवपूर पोलिसात तरूणाविरूध्द आर्मअॅक्टनूसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. देवपूर पोलीस ठाण्याचे पीएसआय स्वप्निल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.11 मे रोजी रात्री 8.15 वाजता पवन राजकुमार पाटील रा.शिवाजीनगर, तलावडी, सेंधवा (म.प्र.) हा तरूण देवपूर बसस्थानकावरून जात असतांना त्याची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली. त्याची झाडाझडती घेतली असता एका कापडी पिशवीत गावठी बनावटीचे 20 हजार 800 रूपये किंमतीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. या फिर्यादीनूसार पवन पाटील यांच्याविरूध्द देवपूर पोलिसात भादंवि कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सहाय्यक उपनिरिक्षक घनश्याम मोरे, हवालदार ईश्वर शिरसाठ, महंमद मोबीन,योगेश चव्हाण,पंकज खैरमोडे, किरण साळवे, रमाकांत पवार आदींच्या पथकाने यशस्वीरित्या केले.