भुसावळ : लॉकडाऊनमध्ये चोरट्या मार्गाने गावठी दारूची विकी्र करणार्यास भुसावळ तालुका पोलिसांनी गस्तीदरम्यान पकडले. सुपडू सोमा भोई (भोईनगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी दुचाकीने साकेगाव-सिगरबर्डी भागात साकेगाव रोडने जात असताना त्याच्या ताब्यातून 35 लिटर कॅनमधील 30 लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली तसेच दुचाकीसह 27 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरूद्ध भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.