गावठी पिस्तूलासह आरोपी एलसीबीच्या ताब्यात

0

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव । शहरातील नविन बसस्थानकातील मुतारीजवळ 20 वर्षीय तरूणाकडे गावठी रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतूस आढळून आले असून रिव्हॉल्व्हरसह तरूणास अटक केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे बसस्थानकाच एकच खळबळ उडाली होती. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस कार्यालयासमोरील नविन बसस्थानकाच्या मुतारीजवळ आरोपी सुनिल ज्ञानेश्‍वर सपकाळे (वय-20) रा.मेडको माता नगर, जुने जळगाव हा गावठी रिव्हॉल्व्हर घेवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यांनतर त्यांनी तातडीने सापळा रचून आरोपी सुनिल सपकाळेजवळ जावून विचारपूर केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे मिळून आल्याने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून गावठी रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतूस मिळून आल्याने आरोपीस अटक करण्यात आली आहे. एलसीबीचे पोलीस कर्मचारी बापू लोटन पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनिल सपकाळे विरूद्ध जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.