जळगाव : गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या संशयीताच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. निलेश उर्फ सुपड्या चंद्रकांत ठाकूर (27, मढी चौक, पिंप्राळा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून गावठी पिस्टल जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पिंप्राळा परीसरातील निलेश उर्फ सुपड्या चंद्रकांत ठाकूर (27) हा संशयीत गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने बुधवार, 4 रोजी संशयीताच्या मुसक्या बांधल्या. संशयीताच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीची गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली. पोलिस नाईक विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुशील चौधरी करीत आहे.
यांनी केली कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, पोलिस नाईक प्रीतमकुमार पाटील, विजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.