Youth from Jalgaon caught with village knife: Crime branch action जळगाव : शहरातील कालिका माता मंदिराजवळ संशयीत पराग राजेंद्र पाटील (21, रा.तेली चौक साई बाबा मंदिराजवळ, शनिपेठ, जळगाव) यास गावठी कट्ट्यासह जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पराग पाटील याच्याविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला मारामारीसह चॉपर बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील कालिका माता मंदीर परीसरात एक संशयीत गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना कळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पथकाने कारवाई करीत संशयीताकडून 30 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त केले. संशयीतला पुढील तपासकामी शनीपेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी आवळल्या मुसक्या
पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार अशोक महाजन, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोलिस नाईक नितीन बावीस्कर, प्रीतम पाटील, अविनाश देवरे आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली.