चिंबळी : गेल्या आडवड्यापुर्वी वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे परिसरात ठिकठिकाणी खरीप हंमागासाठी शेती मशागतीच्या कामांना सुरवात झाली आहे. नव्हाळी हंगामातील पिके काढून शेतीची पुर्णपणे नागंरटी करून ठेवण्यात आली. मान्सुमच्या पावसाने वीजेच्या कडकड्यासह हजेरी लावल्याने शेतात ओलावा निर्माण झाला आहे.
कुरूळी, मोई, निघोजे, केळगांव आदी भागातील शेतकरी वर्गांने खरीप हंगामातील पिके चांगल्या प्रकारे घेण्यासाठी शेतात शेणखत टाकून टॅक्टरच्या साहाय्याने लोटारने, पन्ने पाळी घालणे आदी कामाची सुरुवात केली आहे. शेतमजुरांची टंचाईमुळे शेतकरी वर्गानी बैल पाळणे काही अंशी बंद केले असल्याने मशागतीच्या कामाला ट्रॅक्टरचा उपयोग केला जात आहे.