आंबेगाव : पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. नागरिकांनी गावातील भांडणे गावातच मिटवली पाहिजेत. त्यामुळे पोलीस अधिकारी व स्वत:चा वेळ वाचेल, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे पोलीस चौकीचे उद्घाटन दिलीप वळसे पाटील व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात वळसे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, काकासाहेब पलांडे, अरुण गिरे, मानसिंग पांचुनकर, विष्णू हिंगे, गजानन टोम्पे, प्रदिप जाधव, सोमनाथ पांचाळ, अजय गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.