गिताई बिल्डींगमध्ये घरफोडी; 41 हजारांचे दागिने लंपास

0

जळगाव । उन्हाळ्यानिमित्त परिवारासह कुलुमनाली येथे फिरायला गेलेल्या नरेंद्र जगन्नाथ दहाड (वय 50 ) यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने 41 हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना मंगळवारी भर दिवसा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रिंगरोडवरील जिल्हा बॅँकेच्या समोर असलेल्या गिताई बिल्डिंगमध्ये घडली. दरम्यान, याच इमारतीत राहणारे दहाड यांचे भाऊ मनोज दहाड यांना घटना घडली तेव्हा एक अनोळख तरुण बोळमधून येतांना दिसला.त्यांनी त्याला टोकलेही मात्र थांबवून कोणतीच चौकशी केली नाही. गांभीर्यान चौकशी व घराची तपासणी केली असती तर चोरटा मुद्देमालासह सापडला असता. गिताई बिल्डींगमध्ये मनोज व नरेंद्र दहाड हे दोन्ही भाऊ राहतात. नरेंद्र यांचा खासगी व्यवसाय आहे तर मनोज यांचे याच इमारतीत तळमजल्यात मेडीकल आहे. भाऊ नरेंद्र,वहिणी सुवर्णा दहाड व त्यांचे दोन्ही मुले 12 मे रोजी कुलुमनाली येथे फिरायला गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. दुपारी मनोज हे घरी जेवायला जात असताना नरेंद्र यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा व कुलुप तुटलेल होते तर दरवाजाही उघडा असल्याचे दिसुन आले.