गिरणा टाकीच्या स्वच्छतेला सुरूवात

0

जळगाव। गेल्या काही महिन्यांपूर्वी उपमहापौर ललित कोल्हे यांनी दुषीत पाण्याबाबत आलेल्या तक्रारीवरून मनपाचे सर्व जलकुभांची पाहणी केली होती. तसेच पाणी पुरवठा विभागाला जलकुंभ स्वच्छता व टाक्यांची स्थितीचा अहवाल देण्याचे सुचना दिल्या होत्या. त्यानुसार दहा दिवसापूर्वी गेंदालाल मिल येथील पाण्याची टाकी स्वच्छ करून मोहिमेला सुरवात झाली. या मोहिमेत आज गिरणा पाण्याची टाकीची स्वच्छतेस सुरूवात करण्यात आली आहे. तर टॉकीत मोठ्या प्रमाणात गाळ, शेवाळे काढण्यात आले. तसेच कर्मचार्‍यांकडून गिरणा टाकी परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे.

गिरणा टाक्यांची अवस्था बिकट
गिरणा टाकी मधील तीन नंबर व दोन नंबरची जमीनी लगतच्या टाक्या जून्या असून त्यांची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी टाक्यांवरील स्लॅब पडलेला आहेत तर टाक्यात मोठ्या प्रमाणात गाळ, शेवाळे तसेच झाडे झुडप उगविलेले असल्याचे दिसून आले. आज तीन नंबरच्या टाकीत केलेल्या स्वच्छतेमध्ये बर्‍याच प्रमाणात गाळ व शेवाळे काढण्यात आले. गिरणा टॉकी परिसरात तीन जलुकंभ असल्याने शहरातील अर्धा भागाला पाणी पुरवठा केला जात असतो. पण 2 व 3 नंबरची जमीनीलगत जलकुंभ हे जिर्ण अवस्थेत असून या जलकुंभावरचे स्लॅब पडलेला असून त्या उघड्या आहे.

39 कर्मचार्‍यांनी केली स्वच्छता
गेल्या चार महिन्यापासून जळगाव शहरात दूषित केला जाणारा पाणी पुरवठा बाबत तक्रारी येत होत्या. त्यानुसार उपमहापौर ललित कोल्हे यांनी वीस दिवसापूर्वी शहरातील सर्व जलकुंभाची पाहणी केली होती. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून माहिती घेवून जलकुंभाच्या स्वच्छता, दुरुस्तीसाठी लवकर प्रक्रिया राबविण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गेंदालाल मिल येथील पाण्याची टॉकी स्वच्छता करून मोहिमेला सुरवात झाली. त्यानंतर 23 जुलैला पिंप्राळा पाण्याची टॉकी, 24 जुैलाल हेमुकलानी उद्यानातील जलकुंभची स्वच्छता करण्यात आली. या टॉक्यांमधून देखील मोठ्या प्रमाणात गाळ काढून टाक्यांची स्वच्छता करण्यात आली. गिरणा टॉकी येथील 3 नंबरचा 45 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ स्वच्छतेला पाणी पुरवठा विभागाचे 39 कर्मचार्‍यांनी स्वच्छता केली. परंतू टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ, शेवाळे असल्याने एका दिवसात स्वच्छता न झाल्याने दोन दिवसानंतर पून्हा स्वच्छता केली जाणार आहे. तसेच बुधवारी गिरणा टाकी येथील 1 नंबरची 28 लाख लिटर क्षमतेची उंचावरील जलकुंभाची स्वच्छता करण्यात येणार आहे.

1 ऑगस्ट पर्यंत जलकुंभाची स्वच्छता
महापालिकेच्या जलुकंभाची स्वच्छता मोहिम 1 ऑगस्ट पर्यंत असणार असून उद्या (ता.26) गिरणा टॉकी येथील 1 नंबरची उंच टाकी, 27 जुलैला आकाशवाणी जलकुंभ टाकी, 28 जुलैला दोन व तिन नंबरची गिरणा टाकी, 29 जुलैला खोटे नगर जलकुंभ, 30 जुलैला नित्यानंद नगर जलकुंभ, 1 ऑगस्टला खोटे नगर जलकुंभ स्वच्छ केला जाणार आहे. जलकुंभाची स्वच्छता केल्यानंतर नागरिकांनी स्वच्छ पाणी मिळेल. दरम्यान, टाक्यांची नियमीत स्वच्छता करण्यात येणार आहे.