जळगाव । पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई लक्षात घेता गिरणा धरणातून गिरणा नदिपात्रात सोडण्यात आलेले पाण्याचे आवर्तन शिरसोली सह परिसरातील गावांसाठी दापोर्या बांधार्या पंर्यत सोडावे अश्या मागणिचे निवेदन माजीमंत्री गुलाबरावजी देवकर यांनी बुधवारी 4 रोजी गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री माने यांना दिले. गिरणा नदिपात्रातील दापोरा बांधार्यावरून संध्या शिरसोली प्र.न., शिरसोली प्र. बो., दापोरा, दापोरी, खर्ची, लमांजन, रवंजे बु. खुर्द व रिंगणगाव गावांच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजना आहेत. संध्या स्थितीत पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे या सर्व गावांना दहा ते पंधरा दिवसात पाणीपुरवठा होत आहे.
30 हजार लोकसंख्येच्या वस्तीची होणार सोर
यात शिरसोली प्र . बो. व प्र.न. या दोन्ही गावांची लोकसंख्या सुमारे तीस हजारां पंर्यत आहे. तेथिल नागरीकांना पाण्यासाठी संध्या वणवण भटकावे लागत आहे . दापोर्या बांधार्या पंर्यत हे आवर्तन आल्यास त्या काठावरील गावांच्या पाणीप्रश्न सुटेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे . यावेळी अभियंता श्री माने दापोर्या बंधार्या पर्यत आवर्तन सोडण्याबाबत अश्वासन दिले . यावेळी दर्या सागर संस्थेचे अंध्यक्ष भगवान सपकाळे , शिरसोली प्र.न. चे सरपंच हरि बोबडे , शिरसोली प्र. बो. चे सरपंच रामभाऊ भिल , प्रदिप रावसाहेब पाटील , अॅड. विजय काटोले , दापोरीचे सरपंच निलेश पाटील , माजी सरपंच गोविंद तांदळे , संतोष पानगळे , अशोक साठे , समाधान निकुंभ , अरूण सोनवणे , संतोष राक्षे, उज्वल पाटील यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.