नगरदेवळा । गिरणा नदीच्या मागील तीन दिवसांपासुन सोडलेल्या आवर्तनामुळे नगरदेवळा स्टेशन जवळील पाटचारी क्र.12 जवळच्या शेतात पाणी साचले असून ऐन कापणीवर आलेल्या हरभरा पाण्यात गेला असल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले असून कापणीस आलेला हरभरा पाण्यात गेला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .मागील तीन दिवसांपासून गिरणेचे आवर्तन सुटले असून नगरदेवळा स्टेशन जवळील पाटचारी क्रमांक 12 ला लागूनच शेतकरी राजेश जाधव यांचे शेत आहे. या शेतात 60 गुंठे हरभरा पेरला असून ऐन कापणीस आलेल्या हरभराचे पीक पाण्याखाली गेले आहे तर इतर शेतात अजून पाणी पसरत आहे. खरीपाची थप्पड बसलेल्या शेतकर्यास रब्बी चे हाता तोंडाशी आलेला घास गिरनेच्या आवर्तनात सडत आहे.