गिरीश महाजनांची ‘विनाश काले विपरीत बुद्धी’

0

जळगाव – चार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत गैरमार्गाने मिळविलेल्या यशामुळे ना. गिरीष महाजन यांना प्रचंड गर्व झाला असून ते वस्तूस्थिती विसरत आहे. परंतू गर्वाचे घर नेहमी खाली असते याचा त्यांना विसर पडला आहे. रावणाचे सुद्धा गर्वहरण झाले होते. इतिहासात आणि वर्तमानपत्रात दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत जनतेने अनेक दिग्गजांचे गर्वहरण केल्याची उदाहरणे कमी नाहीत. ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ अशी महाजनांची गत झालेली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी, राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष ललीत बागुल, योगेश देसले, भरत कर्डीले, दुर्गेश पाटील, अरविंद मनकरी यांची उपस्थिती होती.

बारामती सोडा तालुक्यासह जिल्ह्याचा विकास करण्याचा सल्ला
राज्यात आणि जिल्ह्याचे दुदैव आहे की, कमी अभ्यासाचे आणि कमी उंचीचे लोक मोठ्या पदावर जावून बसले आहे. त्यामुळे त्यांना खूप मोठे वाटायला लागले आहे. त्याभूमिकेतून इथेच नाही तर इतर ठिकाणी गैरमार्गाने महानगरपालिका निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते स्वत:ला मोठे राजकारणी किंवा चाणक्य समजायला लागले आहे. म्हणून मग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टिका करायला सुरूवात केली. परंतू शरद पवार यांच्या बारामती मतदार संघात निवडणूकही निवडून दाखवून असा गर्वाने सांगायला लागले. परंतू गर्वाचे घर नेहमी खाली असते याचा त्यांना विसर पडला असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली आहे.