जळगाव: शहरातील कचरा संकलनाचा मक्ता घेतलेली नाशिकची वॉटरग्रेस कंपनी आणि भाजपाचे आमदार, माजी मंत्री गिरीश महाजन यांचे कनेक्शन (?) असल्याचे आरोप झाल्यानंतर आपल्या नेत्याच्या बचावासाठी भाजपा मैदानात उतरला आहे. महाजन व वॉटरग्रेस यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा आमदार सुरेश भोळे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला आहे. हे दोघेही पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत बोलत होते. परंतु, ज्यांच्याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत ते गिरीश महाजन मात्र, माध्यमांना तोंड देण्यासाठी स्वतः उपस्थित नव्हते. त्यांनी कार्यकर्त्यांनाच पुढे केलेले दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून वॉटरग्रेस प्रकरणात आ. गिरीश महाजन यांचे नाव जोडले जात आहे पण वॉटरग्रेस कंपनी न्यायालयामध्ये जाऊन केस जिंकली. त्यामुळे वॉटरग्रेसला ठेका दिला नसता तर त्यांना दंड स्वरूपात मोठी रक्कम द्यावी लागली असती. म्हणूनच हा दंड टाळण्यासाठी महापालिकेने वॉटरग्रेसला हा ठेका दिला आहे. यात गिरीश महाजन यांचा काहीही संबंध नाही. विरोधक याप्रकरणी फक्त बननामी करायचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी केला. यावेळी महापौर भारती सोनावणे, कैलास सोनवणे, दीपक सूर्यवंशी, डॉ. राधेशाम चौधरी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.
महाजनांचा वॉटरग्रेसशी काहीही संबंध नाही
आ. सुरेश भोळे यांचा दावा
जळगाव: शहरातील कचरा संकलनाचा मक्ता घेतलेली नाशिकची वॉटरग्रेस कंपनी आणि भाजपाचे आमदार, माजी मंत्री गिरीश महाजन यांचे कनेक्शन (?) असल्याचे आरोप झाल्यानंतर आपल्या नेत्याच्या बचावासाठी भाजपा मैदानात उतरला आहे. महाजन व वॉटरग्रेस यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा आमदार सुरेश भोळे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला आहे. हे दोघेही पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत बोलत होते. परंतु, ज्यांच्याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत ते गिरीश महाजन मात्र, माध्यमांना तोंड देण्यासाठी स्वतः उपस्थित नव्हते. त्यांनी कार्यकर्त्यांनाच पुढे केलेले दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून वॉटरग्रेस प्रकरणात आ. गिरीश महाजन यांचे नाव जोडले जात आहे पण वॉटरग्रेस कंपनी न्यायालयामध्ये जाऊन केस जिंकली. त्यामुळे वॉटरग्रेसला ठेका दिला नसता तर त्यांना दंड स्वरूपात मोठी रक्कम द्यावी लागली असती. म्हणूनच हा दंड टाळण्यासाठी महापालिकेने वॉटरग्रेसला हा ठेका दिला आहे. यात गिरीश महाजन यांचा काहीही संबंध नाही. विरोधक याप्रकरणी फक्त बननामी करायचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी केला. यावेळी महापौर भारती सोनावणे, कैलास सोनावणे, दीपक सूर्यवंशी, डॉ. राधेशाम चौधरी, विशाल त्रिपाठी उपस्थित होते.
विरोधक करताहेत बदनामीचा प्रयत्न
वॉटरग्रेस कंपनी भारतातील नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, धुळे, जळगाव, मुंबई, दिल्ली, रांची, लखनऊ या शहरात तसेच आफ्रिका खंडातील युगांडामध्ये काम करत आहे. यामुळे ही कंपनी निकृष्ट दर्जाची. कायदेशीर पद्धतीने तिला ठेका देण्यात आलेला आहे, असे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले. डॉ. राधेशाम चौधरी म्हणाले की, कोणताही ठेका देण्याची कायद्याने सांगितलेली एक पद्धत असते व तीच पद्दत महापालिकेनेसुद्धा अवलंबवली आहे.
ज्यांच्यावर आरोप ते गिरीश महाजन गैरहजर
वॉटरग्रेस कंपनी आणि गिरीश महाजन यांच्या अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याचे प्रश्न यापूर्वी अनेकदा उपस्थित केले गेले आहेत. आज या प्रकरणात भाजपा पदाधिकार्यांनी गिरीश महाजन यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण जे संशयाच्या घेर्यात आहेत ते गिरीश महाजन मात्र, पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते.
गिरीश महाजनांना तुम्ही आरोपीच्या पिंजर्यात अडकवू शकत नाही
गिरीश महाजन आणि बीएचआर प्रकरणातील प्रमुख संशयित सुनील झंवर यांच्या संबंधांबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर बोलताना आमदार भोळे म्हणाले की, दोघांचे संबंध चांगले आहेत म्हणून तुम्ही महाजन यांना आरोपीच्या पिंजर्यात अडकवू शकत नाही. झंवर दोषी असतील, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
मार्चपर्यंत जळगाव खड्डेमुक्त होणार नाही !
आमदार भोळे म्हणाले की, शहरात अमृत योजनेचे काम सुरु आहे. ते मार्चपर्यंत पूर्ण होईल, अशी आम्हाला आशा आहे. 64 कोटी रुपये अजूनही राज्य सरकारकडून मिळायचे आहेत. राज्यात आमचे सरकार न आल्याने हे पैसे मिळू शकले नाहीत तरीही शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असून, त्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी 50 लाखाची तरतूद महापालिकेने केली आहे.
आमदार साहेब, तुम्ही पत्रकार परिषद घेतली. तुम्हीच उत्तर द्या!
– वॉटरग्रेस, झंवर कनेक्शन अंगलट येणार असल्याची भीती गिरीश महाजनांना वाटू लागली आहे का ?
– गिरीश महाजन यांनी आपली बाजू स्वतःच मांडणे संयुक्तिक ठरले नसते का ?
– गिरीश महाजनांनी माध्यमांनी सामोरे जाणे का टाळले ?