भुसावळ। गिरीश सुर्यकांत मुनेश्वर यांनी इयत्ता नववीसाठी जवाहर नवोदय विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये यश संपादन केले असून त्याची निवड झाली आहे.
गिरीषने अखिल भारतीय स्तरावर घेण्यात आलेल्या परिक्षेत यश प्राप्त केले असून त्याला आई, वडिलांसह संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक महेश मुनेश्वर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. रोबाटिक्स तसेच प्रगत तंत्रज्ञानाची आवड असलेल्या गिरीषने अभियांत्रिकी स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. येथील के. नारखेडे विद्यालय येथे सेमी इंग्रजी माध्यमचा तो विद्यार्थी होता.