गीता गवळी उध्दव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांकडे

0

मुंबई। महापौर निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना सावध पावले टाकत असताना, आता भाजपनेही हालचालीला सुरुवात केली आहे. अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गिता गवळी उध्दव ठाकरेंच्या भेटीला आल्या होत्या. त्या शिवसेनाभवनात आल्या मात्र लगेचच मुख्यमंत्र्यांचा फोन येताच त्यांनी आपला मोर्चा माघारी वळवला. त्या भाजपकडे चर्चेसाठी निघून गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गीता गवळी, यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांनी आज शिवसेना भवनातही हजेरी लावली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दाबावामुळे शिवसेना भवनात गीता गवळी आणि एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्यातील बोलणी फिस्कटली. त्यामुळे गीता गवळी निर्णय न घेताच सेनाभवनातून परतल्या. गीता गवळी यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बोलवले आहे. गीता गवळी यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी थेट अरुण गवळी यांच्याकडून मध्यस्थीचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. गीता गवळी यांना प्रथम वर्षी आरोग्य समिती अध्यक्षपद आणि पाच वर्ष स्थायी समिती सदस्य पद हवे आहे. त्यामुळे आज रात्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गीता गवळी अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.