मुंबई । घाटकोपर पश्चिम येथील आर. एन. शेठ रत्नचंद्रजी इंग्रजी माध्यमिक शाळेच्या प्राचार्य गीता नवीनचंद्र शेट्टी यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 2016-2017 कालावधीत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना महापौर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गीता शेट्टी या आर एन शेठ रत्नचंद्रजी इंग्रजी माध्यमिक शाळेच्या प्राचार्य असून त्यांचे एचएससी, डीएड, बीए पूर्ण झाले आहे.
सन 1984 ते 2007 त्यांनी इयत्ता 1 ली ते 4 थी या वर्गांवर अध्यापनाचे उत्तम कार्य केले आहे. 2007 पासून त्यांनी मुख्याध्यापिका पदाचा कार्यभार सांभाळायला सुरुवात केली. 1994 पासून 2014 पर्यंत गीता शेट्टी यांनी शिष्यवृत्ती वर्गावर इंग्रजी आणि गणित विषयांचे मार्गदर्शन केले आहे. गीता शेट्टी या शैक्षणिक क्षेत्रात 36 वर्ष अविरत कार्यरत असून शाळेसाठी निष्ठेने केलेल्या त्यांच्या विशेष कार्याला विविध सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना 2016-2017 विशेष कार्य केल्याचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सन्माननीय महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.