गुंडांच्या हल्ल्यात दूध पोहचविण्यासाठी गेलेला तरुण ठार

0

पुणे : औंध परिसरातील कस्तुरबा वसाहतीत दूध पोहचविण्यासाठी गेलेल्या तरुणावर सराईत गुंडाने प्राणघातक हल्ला केला. रोहित जुनवणे (वय, २८) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हल्ल्यात जखमी रोहितचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे ५ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास हा प्रकार घडला.

रोहित दूध घालण्यासाठी रोज कस्तुरबा वसाहतीत येत होता. आज नेहमीप्रमाणे तो आला असता हल्लेखोरांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. रोहितच्या डोक्यात १० ते १२ वार करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. रोहित बेशुद्धावस्थेत असल्यामुळे हा हल्ला नेमका कोणी आणि का केला? याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.