धुळे । शहरात प्रथमच स्मिता इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस ही वित्तीय संस्था दाखल झाली आहे. काल या संस्थेचा शुभारंभ प्रसिद्ध चार्टर्ड अकौटंट लोकेंद्र मुंदडा व नरेश शाह यांच्या हस्ते करण्यात आला. स्मिता इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस या वित्तीय संस्थेने म्युचुअल फंड, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आदी सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. वित्तीय क्षेत्रातील नामांकीत कंपनीच्या सेवा स्मिता इन्व्हेस्टमेंटने एका छताखाली आणल्या आहेत.
विविध कंपन्यांचा समावेश
यात एलआयसी, युटीआय, एचडीएफसी, रॉयल सुंदरम, स्टार, आयडीबाय, आयसीआयसीआय, एचडीएफसी लाईफ, न्यू इंडिया इन्शुरन्स यांचा समावेश आहे. सर्वांना उपयोगी पडतील अशा विविध गुंतवणुकीच्या योजनांचे बहुपर्याय ग्राहकांना उपलब्ध झाले आहेत. औरंगाबाद, पुणे, आंबाजोगाई, लातूर, बीड, नाशिक, ठाणे नंतर स्मिता इन्व्हेस्टमेंटचे कार्यालय झाशी राणी चौकात सुरु झाले आहे. काल सायंकाळी 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला. याप्रसंगी लोकेंद्र मुंदडा, नरेश शहा, जयंत गोरे, स्मिता गोरे, जितेंद्र मुंदडा, नितीन मुंदडा, स्वात जोशी, हर्षवर्धन शाह आदी उपस्थित होते.