गुगलवर फेकू टाका, मोदींचे नाव येते!

0

पिंपरी-चिंचवड । तुम्ही गुगलवर फेकू शब्द टाइप करून सर्च केले तर त्याठिकाणी नरेंद्र मोदी यांचे नाव येते. स्मार्ट सिटी हे फेकुचे दुसरे उदाहरण आहे असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. भाजप नेहमी सांगते कि अच्छे दिन आयेगे. केवळ भाजपचे अच्छे दिन आले आहेत, त्या पक्षाचे उत्पन्न वाढले आहे. या पक्षाचे उत्पन्न 100 कोटी होते ते आता दीड हजार कोटी झाले आहे. अच्छे दिन जरूर आयेगे, पण मोदी नाही, अजितदादाच लाएंगे असे सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

पिंपरी चिंचवड आणि दादा हे समीकरण
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या पिंपरी-चिंचवड शहर हे अजितदादांचा एरिया म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि दादा हे देशात समीकरण झाले आहे. मोदी हे फेकू आहेत आणि स्मार्ट सिटी फेकुचे दुसरे उदाहरण आहे. स्मार्ट सिटीमध्ये पिंपळे सौदागर सलोखा विकसित भाग घेतला आहे. पुण्यात बालेवाडी घेतले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडचा विकास दादांनी मोठ्या प्रमाणात केला आहे.

धनंजय मुंडे यांनी ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडविताना म्हटले की, गावात जाऊन अच्छे दिन म्हणा, लोक हसतात, एवढे अच्छे दिनचे हसू झाले आहे. जोक करायची गरज नाही, मोदींचे मंत्रीदेखील अच्छे दिनची चेष्टा करत आहेत. असे मुंडे म्हणाले. गॅसचे भाव वाढले, पेट्रोल महागले, महागाई गगनाला बदली आहे. दरवर्षी सहा कोटीचे आश्‍वासन दिले होते, नोकरी मिळेल, छोकरी मिळेल असे वाटले पण काहीच मिळाले नाही. यापुढे रोजगार मागायचे नाहीत, कार्यालयासमोर भाजी तळायची. यावेळी सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, चित्रा वाघ, संजोग वाघेरे-पाटील, विलास लांडे, आण्णा बनसोडे, योगेश बहल, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, जयदेव गायकवाड यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.