मुंबई : प्रिया वारियर म्हंटल की सर्वांना तिचा व्हायरल व्हिडिओ डोळ्यासमोर येतो. त्या एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रिया भारताची नॅशनल क्रश बनली. भारतातच नाही तर जगभरात तिची लोकप्रियता पसरली. एका व्हायरल व्हिडिओमुळे ती प्रसिद्ध झाली आणि एका दिवसात इन्स्टाग्रामवर तिने सर्वाधिक फॉलोअर्स मिळवले.
२०१८ या वर्षभरात गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये प्रियाचं नाव अग्रस्थानी आहे. ‘गुगल इंडिया’कडून बुधवारी ही माहिती जाहीर करण्यात आली. तिच्यापाठोपाठ अमेरिकन गायक निक जोनासने बाजी मारली. तर प्रियांका चोप्रा या यादीत चौथ्या स्थानावर आहे.