चाळीसगाव। तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव अंतर्गत चाळीसगावपासून सुमारे 67 कि.मी. अंतरावर नाशिक जिल्हा ओलांडून पुढे जावे लागत असलेल्या डोंगराळ व अतिदुर्गम भागातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना भारत सरकारच्या मिशनद्वारे आज वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे व डॉ.आशा राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारींनी लसीकरण व इतर उपक्रम राबविलेत. तसेच डॉ.प्रमोद सोनवणे व आरोग्य सहायक एल.सी.जाधव यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची कुष्ठरोग तपासणीकेली. शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
तालुका सुपरवायझर बी.ई.देवरे यांनी नियमित पाणीपुरवठा शुद्धीकरण करण्यासाठी जलसुरक्षक श्री बाळू भाऊराव मेंगाळ यांना सुचना दिल्यात. आरोग्य सेवक विजय देशमुख व आरोग्यसेवक अशोक परदेशी यांनी गावातील प्रत्येक घराचे पाणीसाठ्यांचे अबेटिंग व सर्वेक्षण करून ताप रूग्ण व जुलाबाचे रूग्णांना सञाचे ठिकाणी उपचारासाठी आणले. यावेळी आरोग्यसेविका श्रीमती सरला चव्हाण यांनी बालकांना लसीकरण केले. वाहनचालक नरेश देशमुख, परिचर सुनिल मोरे, अटेंडन्ट यमुनाबाई घोरपडे, अंगणवाडी सेविका शकुंतला फतवे, मदतनीस गिताबाई जाधव यांनी आजचे मिशन इंद्रधनुष्य यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.