गुजरातमध्ये कॉंग्रेसला धक्का; एका आमदाराचा भाजपात प्रवेश

0

गांधीनगर-गुजरातमधील काँग्रेस नेते कुवरजी बवालिया यांनी मंगळवारी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश केला. राहुल गांधी हे मतांसाठी जातीय राजकारण करतात अशी टीका करत त्यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांना विजय रुपाणी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

कुवरजी बवालिया यांनी मंगळवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे राजीनामा सोपवल्यानंतर बवालिया हे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. बवालिया हे चार वेळा आमदार राहिले असून सध्या ते राजकोट जिल्ह्यातील जसदान मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

२००९ मध्ये ते लोकसभेवरही निवडून गेले होते. बवालिया हे गुजरातमधील कोळी समाजातील नेते असून गुजरातच्या ६ कोटींच्या लोकसंख्येत कोळी समाजाचे प्रमाण २२ टक्के आहे. या समाजात बवालिया यांचा दबदबा आहे. बवालिया यांनी १५ दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कामकाजाविरोधात त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. मात्र, यानंतर पक्षाकडून बवालिया यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.

‘राहुल गांधी हे मतांसाठी जातीय राजकारण करतात. यामुळे मला मतदारसंघात काम करणे अशक्य झाले. माझा नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर विश्वास असून तेच देशाचा विकास करतील, असे त्यांनी सांगितले. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत बवालिया राजकोटमधून खासदार म्हणून निवडून आले होते. बवालिया हे तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क असलेले नेते असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल, असे भाजपाने म्हटले आहे. बवालिया यांच्यापूर्वी जावीद पिरझादा आणि विक्रम मडाम या दोन काँग्रेस आमदारांनीही पक्षातील कार्यप्रणालीवर जाहीरपणे आहे.