गुजरातमध्ये कॉंग्रेसला मोठा झटका; अल्पेश ठाकोर यांचा कॉंग्रेसला रामराम?

0

अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्ष आपली प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात काही नाराज नेत्यांकडून बंडाचा अवलंबिला जात असल्याचे दिसून येते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. अल्पेश ठाकोर यांच्या जवळचे सहकारी धवल झाला यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला याबाबतची माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अल्पेश ठाकोर काँग्रेसमध्ये नाराज होते. ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सुरु होती. मात्र, गेल्या मार्च महिन्यात अल्पेश ठाकोर यांनी यावर स्पष्टीकरण दिल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. त्यावेळी अल्पेश ठाकोर यांनी आपण काँग्रेसमध्येच राहून पार्टीला पाठिंबा देणार आहे आणि समाजाच्या हक्कासाठी लढणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांचे सहकारी धवल झाला यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याचे समजते.

भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांना मंत्रीपद देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने दुर्लक्षित केल्याचा आरोप अल्पेश ठाकोर यांनी केला होता.