गुजरातमध्ये सत्ताविरोधी वातावरण

0

अहमदाबाद : गुजरातमध्ये सत्ताविरोधी वातावरण असल्याचे नाकारत नसल्याची कबुली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे. अनेक वर्षांपासून सत्तेत असल्याने सत्ताविरोधी वातावरणाचा सामना करावा लागतो, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली आहे.

भाजपला 150 जागा मिळतील
एका मुलाखतीत अमित शहा यांनी म्हटले की, अनेक वर्षांपासून सत्तेत असल्याने सत्ताविरोधी वातावरण आहे, हे मी नाकारत नाही. मात्र तुम्ही आश्वासनांची पूर्तता केली असेल, लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असतील, तर विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मते मिळवू शकता. भाजप यामध्ये यशस्वी ठरला आहे. गुजरातमध्ये 24 तास वीजपुरवठा आहे. चांगल्या दर्जाचे रस्ते आहेत. राज्यातील कल्याणकारी योजनांच्या यशावर कोणीही प्रश्न उपस्थित करु शकत नाही. भाजपने सकारात्मकपणे स्वत:ची मतपेढी विकसित केली आहे. आता गुजरातमध्ये कधीही संचारबंदी लागू होत नाही. टँकरची गरजही भासत नाही. त्यामुळेच गुजरातमध्ये भाजपला 150 जागा मिळतील, असे शहांनी म्हटले.