शिरपूर । गुजर खर्दे ता.शिरपूर येथे ग्रामसेवकाने नियमांचे उल्लंघन करून बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र दिल्याने त्याचावर सक्त कारवाई करण्यात यावी तसेच भूमिगत गटारी व रस्ते बववावेत यासाठी डॉ. सरोज पाटील यांनी उपषोण सुरू केले होते. विस्तार अधिकार्यांनी भूमिगत गटारी व रस्ते बनविण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर डॉ. पाटील यांनी उपोषण साडले. डॉ. पाटील यांना शिवराम पाटील,अशोक पाटील,गोरख ठाकरे ,सुनिता विजय शिसोदे ,अंजू माली यांनी पाठिंबा दिला होता. गुजर खर्दे येथे नवीन लेआऊट मंजूरी देतांना रस्ते,गटार ,वीज या मुलभूत सुविधा न देता विकासकाला उपविभागीय आधिकार्यांनी सनद दिली. विकासकाने रस्ते,पाणी,गटार व सांडपाण्याची सोय केल्याशिवाय प्लॉटविक्रीची परवानगी देऊ नये. उपविभागीय आधिकारी व ग्रामसेवक यांनी विकासकाकडून आर्थिक लाभ घेऊन नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केले. ग्रामसेवकावर सक्त कारवाई झाली पाहिजे अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली.
लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
गुरूवारी ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच यांनी उपोषणस्थळी भेट दिली होती. त्यांनी डॉ. सरोज पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दोन महिन्यात रस्ते व गटारीचे काम करू असे तोंडी आश्वासन दिले. परंतु डॉ सरोज पाटील यांनी मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. विस्तार आधिकारी मोरे, ग्रामसेवक कुमावत व सरपंच भरत पाटील उपोषणकर्ते डॉ.सरोज पाटील यांना ,15दिवसात भूमिगत गटारी व रस्ते बनवण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर डॉ. पाटील यांच्या उपोषणाची सांगता केली.