भुसावळ। भारतीय रक्षा मंत्रालयाच्या आयुध निर्माणी विभागातर्फे बँगलोर येथे आयोजित जागतिक स्तरावरील डिजिटल उपक्रमांतर्गत स्मार्ट इंडिया हेकेशॉन 2017 या स्पर्धेत संकेत गुजर या विद्यार्थ्याने सादर केलेल्या संशोधन प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. संंकेत गुजर हा पुणे येथील पीआयसीटी अभियांत्रिकी विद्यालयातील विद्यार्थी असून त्याने वाहनांची चोरी रोखण्यासाठी बनविलेल्या संशोधन प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला.
एक लाख रुपयांचे बक्षिस
संपूर्ण भारतातून निवड झालेल्या 66 शोध प्रकल्पामधून सर्वोत्कृष्ट संकल्पना व सादरीकरणाबद्दल एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. संकेत हा नाहाटा महाविद्यालयाचे प्रा. माधुरी गुजर व दिपनगर येथून निवृत्त झालेले उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गुजर यांचा मुलगा आहे.