अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
हे देखील वाचा
आळंदी : बेकायदेशीर गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एका टेम्पोसह सहा लाख 460 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि. 20) आळंदी मरकळ रोडवर गोळेगाव फाटा येथे केली. अशोक भगाराम पटेल (वय 27, रा. रामनगर) असे अटक के लेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या मा हितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई अशोक गारगोटे आळंदी हद्दीत गस्त घालत बेकायदेशीर गुटखा वाहतूक होत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पो लिसांनी आळंदी मरकळ रोडवर गोळेगाव फाटा येथे अल्फा प्लस कंपनीचा मिनी टेम्पो (एम एच 14 / ई एम 4398) अडवला. त्याची झडती घेतली असता त्यामध्ये रजनीगंधा, विमल, आरएमडी इत्यादी लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला. त्यावरून पोलिसांनी टेम्पोचालक अशोक याला अटक केली. त्याच्याकडून टेम्पोसह सहा लाख 460 रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस कर्मचारी राजेंद्र बांबळे, प्रदीप शेलार, राजन महाडिक, रमेश भिसे, बाळासाहेब सूर्यवंशी, दिनकर भुजबळ, अशोक गारगोटे, दादा धस यांच्या पथकाने केली.