लाखाचा गुटखा जप्त ; मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी
मुक्ताईनगर- चारचाकी वाहनातून गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी सापळा रचून संशयास्पद वाहनाचा पाठलाग करून पाचोर्याच्या व्यापार्यासह दोघांना पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. चारचाकी वाहनातून सुमारे एक लाखांवर किंमतीचा विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे. अर्जुन पमनदास खेमानी (35, सिंधी कॉलनी, पाचोरा) व चालकाला याकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सुभाष नेवे, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साळुंखे, पोलिस नाईक मोझेस पवार, प्रमोद तायडे, सुनील बडगुजर आदींच्या पथकाने केली.
(सविस्तर बातमी उद्याच्या अंकात)