गुड्ड्याच्या हत्त्येमागे राजकीय षडयंत्र – आ.अनिल गोटेंचा आरोप

0

धुळे । गुंंड गुड्डयाच्या हत्येमागे मोठे राजकीय षडयंत्र आहे महानगरपालिका जळीत कांडाची सुनावणी न्यायालयात सुरु होत असून त्यामुळे या जळीत कांडामागचे सफेदपोष राजकीय गुंडांचे चेहरे जनतेसमोर येणार होते. त्यामुळेच या सफेदपोष राजकिय गुंडांनी पक्षबंधुंच्या माध्यमातून गुड्डयाची हत्या केल्याचा सनसनाटी आरोप आ.अनिल गोटे यांनी केला आहे. त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख एम. रामकुमार यांना निवेदन दिले असून त्या निवेदनात आ.गोटे म्हणतात की, निघृणपणे हत्या झालेला गुड्ड्या चोर याची ज्यांनी हत्या घडवून आणली त्यांचा म्होरक्या. पापा गोयर आणि कंपनी दोघांचाही राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष आहे. पक्ष बंधू आहेत. धुळे शहरातील गुंडगिरीचे अथवा टोळी युध्दाचे स्वरूप फारच सरळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या एकाच पक्षातील दोन टोळ्यामधील संघर्ष आहे. धुळे शहराच्या मागील 20 वर्षाच्या कालखंडात हत्या प्रकरणांचा बारकाईने शोध घेतल्यास एकाच राजकीय पक्षातील दोन गुंडाच्या टोळ्यामध्ये संघर्ष होत राहिला व त्यातुनच हत्या घडल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.