भुसावळ । आपणही समाजाचं देणं लागतो या भावनेतून राजर्षि शाहु महाराज बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे समाजातील पहिली ते पदवी-पदविका परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या 150 गुणवंतांचा रविवारी दुपारी सन्मान करण्यात आला. सत्काराने गुणवंत भारावले. प्रसंगी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार यांना मराठा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, सी.ए. प्रवीण महाजन, जिल्हा परिषदचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, महेंद्र पाटील, साकेगावचे सरपंच आनंदा ठाकरे, शेंदुर्णीच्या गरूड महाविद्यालयाचे प्राचार्य ही.आर.पाटील, उद्योजक श्रीराम दयाराम पाटील, डॉ. सुरेश पाटील आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थापक अध्यक्ष टी.एस. बावस्कर, अध्यक्ष पी.बी.चौधरी, उपाध्यक्ष व्ही.डी. पाटील, सचिव साहेबराव पाटील, संचालक अरुण पाटील, ज्ञानेश्वर घुले, आर.एन. चौधरी, ज्ञानदेव पाटील, डी.एस. पाटील, विजय शितोळे, महेंद्र बाविस्कर, आर.एन. पाटील, डिगंबर पाटील, कुर्हा शाखेचे अध्यक्ष संजय पाटील व सचिव गिरीश पवार, संचालक अलका पाटील, अमोल दंदाले, एन.डी. राणे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन महेंद्र पाटील व प्रा. पंकज पाटील यांनी केले.