गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

0

वरणगाव । येथील ब्राम्हण संघाकडून समाजातील इयत्ता पहिली, 12 वी व इतर शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा विठ्ठल मंदिरात आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.जे. नाईक होते तर समाजाचे अध्यक्ष योगेश जोशी, चंद्रकांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम ब्राम्हण समाजाचे आराध्य दैवत परशुराम भगवान यांच्या प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन फेडावे समाजाचे ऋण
अध्यक्षीय भाषणात नाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेवून समाजाचे ऋण फेडावे व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी भुषण कुलकर्णी, संदिप नाईक, वैभव जोशी, वासुदेव जोशी, सतीष जोशी, विवेक जोशी, राजेश मांडवगणे आदी समाजबांधवांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुषण कुलकर्णी यांनी केले तर आभार सतीष जोशी यांनी मानले.