गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांसह सर्वांनी प्रयत्न करावे – ना.गुलाबराव पाटील

0

जळगाव- मुलांना इंग्रजी बोलता यावे, म्हणून पालक गल्लोगल्ली सुरू झालेल्या कॉन्वेंटस्कूलमध्ये त्यांचा प्रवेश करतात. आज त्या विद्यार्थ्यांना स्वत: मातृभाषा सुध्दा शिकण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद, मनपा शाळातील पटसंख्या कमी होत आहे. आता ती वाढविण्यासाठी शिक्षकांसह सर्वांनी प्रयत्न करून विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले पाहिजे, असे आवाहन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

सरदार वल्लभभाई पटेल बहूउद्देशिय संस्था, रोटरी क्लब सेंट्रल आणि युवा विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सन्मान गुरूजनांचा’ हा कार्यक्रम शनिवारी दुपारी २ वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, प्र-कुलगुरू पी़पी़माहुलीकर, विष्णु भंगाळे, डॉ़ स्नेहल फेगडे, शरद तायडे, रमाकांत वाणी, व्ही़झेड़ पाटील, बी़बी़पाटील, विलास नेरकर, नरेंद्र बोरसे आदी मान्यवरांची उपस्थित होती़ मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले़ शिक्षक हा समाज निर्माण करत असतो, आई-वडीलांनंतर योग्य मार्गदर्शन करणार हा शिक्षकच़ असे म्हणून विष्णु भंगाळे यांनी प्रास्ताविक केले.

४४ आदर्श शिक्षकांचा सन्मान
उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ४४ शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ देवयानी बेंडाळे, संजय अत्तरदे, डॉ़ इंदिरा पाटील, चारूलता पाटील, जितेंद्र पाटील, किरण गौराणी, शैलेश महाजन, तुषार चव्हाण, रियाज अहमद जाफर, नितीन फेगडे, हिरासिंग परदेशी, नितीन पाटील, विजय पाटील, अशोक पारधे, एम़जे़पाटील, वाय़जी़पाटील, ललित धांडे, शाम ठाकरे, राजेंद्र फालक, लिना चौधरी, ज्योती देशपांडे, पद्माकर चौधरी, स्वाती चौधरी, इमरान खाटीक, आशा तळेले, झरीन बी शेख, शारदा नारखेडे, भुपेंद्र पाटील, ललिता पाटील, सुनील बडगुजर, स्मिता पाटील, दत्तात्रय पाटी, अनिता पाटील, गोपाल महाजन, दिपक हिरे, सुरेश चव्हाण, सोनाली साळुंखे, देविदास पाटील, समाधान ठाकरे, प्रवीण पार, मोहम्मद हकीम या शिक्षकांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.