गुन्हा नोंदविण्यासाठी चैतन्यांचे आदेश !

0

होळनांथे । येथील स्टेट बँकेत खाते असलेल्या अंजदे बु. येथील आशा कार्यकर्तीची अज्ञात नंबरवरून आलेल्या फोनकॉलमुळे 43 हजार 300 रूपयाची फसवूण झाली होती. दरम्यान याप्रकरणी महिलेने थाळनेर पोलीसांना तक्रार देवून महिना उलटूनदेखील गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. याबाबत दैनिक जनशक्तिने 24 मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध केल्यावर खुद्द पोलीस अधिक्षकांनी दखल घेतल्यामुळे त्यांनी थाळनेर पोलीसांना दिलेल्या आदेशान्वये अखेर 8 मार्च रोजी अज्ञात ऑनलाईन चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ऑनलाईन चोरांबाबत पोलीस अधिक्षकांना विचारणा केली असता, त्यांनी आपल्या प्रतिक्रीयेत हे ऑनलाईन चोर परप्रांती असून, पोलीस यंत्रणा या ऑनलाईन चोराच्या मागावर असून लवकरच त्यांना बेडया ठोकेल असे सांगीतले.

फोनद्वारे मिळविला आधार नंबर
शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत खाते असलेल्या अजंदे बु येथील एका महिलेच्या खात्यामधून परस्पर 43 हजार रूपयाची खरेदी करून फसवूणक केल्याची घटना घडली होती. अंजदे गावातील रत्ना संतोष शिंदे या आशा कार्यकर्ती म्हणून काम करतात. त्यांचे होळनांथे येथील स्टेट बँकेत खाते आहे. दरम्यान दि.6 मार्च रोजी त्यांना एका व्यक्तीचा बँक मॅनेजर असल्याचा फोन आला. मी स्टेट बँकेतून मॅनजर बोलतोय तुमच्या खात्यासंबधी बॅकेला तुमचा आधार नंबरची आवश्यकता आहे. असे सांगून आधार नंबरची मागणी केली. रत्ना शिंदे यांनी भोळेपणात काहीही चौकशी न करता आधार नंबर देवून टाकला. दरम्यान काही तासाचत त्यांच्या खात्यामधून दहा हजार तीन वेळा, पाच हजार दोन वेळा तर दि.9 मार्च रोजी तीन हजार तीनशे रूपयाची खरेदी करण्यात आल्याचे बॅकेतील खात्याच्या स्टेटमेंट वरून त्यांना लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी थाळनेर पोलीस स्टेशन गाठले. पोलीसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली. मात्र थाळनेर पोलीसांनी पंचविस दिवस उलटूनदेखील अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

दैनिक जनशक्तिने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गुन्हा दाखल
महिनाभर वाट पाहून थाळनेर पोलीसांनी तक्रार न दाखल करून घेतल्यामुळे रत्ना शिंदे यांनी दि.8 रोजी पोलीस मुख्यालय गाठले. घडलेल्या प्रकाराची कैफियत पोलीस अधिक्षक एस.चैतन्या यांना सादर केली. त्यासोबत दैनिक जनशक्तिने प्रसिद्ध केलेल्या बातमीचे कात्रण जोडले. दरम्यान पोलीस अधिक्षक एस चैतन्या यांच्या आदेशानूसार दि.8 रोजी थाळनेर पोलीसांनी गुन्ह्याची नोंद के ली असून पुढील तपास सुरू आहे.

ऑनलाईन चोरीचा पुन्हा एक बळी
तालुक्यात ऑनलाईन चोरांचे हे प्रकार सुरूच आहेत. दि.8 रोजी पुन्हा होळनांथे येथील एकास 30 हजारात गंडवण्याचा प्रकाराचे खात्रीशीर वृत्त आहे. मात्र थाळनेर पोलीसांनी याबाबत माहिती देण्यास टाळले आहे.

पोलीसांची अकार्यक्षमता
थाळनेर पोलीसांनी महिना उलटूनही गुन्हा दाखल न केल्याने फसवणूक करणार्‍यांना पुरावे नष्ट करण्यास पोलीसांनी अप्रत्यक्षपणे मदत केल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन फसवणूक करणार्‍याने सिम कार्ड बदलून नंबर बंद केला असेल. सामान्य नागरिक तंत्रज्ञानाबाबत अद्यापही जागृक झालेले नाहीत. त्यांना अधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे याबाबत ज्ञान नसल्याने याचा गैरफायदा उचलून फसवणूक होतांना दिसत आहे. थाळनेर पोलीसांनी वेळीच गुन्हा दाखल करून घेतला असता तर गुन्हेगार शोधण्यास मदत मिळाली असती. परंतु, एका महिन्याच्या उशीराने पेलीस अधीक्षकांनी आदेश दिल्याने थाळनेर पोलीसांना जाग आली असून त्यांनी ऑनलाइन फसवणूक करणार्‍या विरोधात शनिवार 8 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.