गुन्हा नोंद केलेल्या ‘त्या’ अधिकार्‍यांना अटक करा

0

शिंदखेडा। तापी नदीत अवैध वाळू उपश्यामुळे तयार झालेल्या खड्डयात तालुक्यातील अक्कडसे येथील सतिश सैंदाणे या तरूणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या वाळू ठेकेदार, अधिकारी, कर्मचा-यांना अटक करण्यात यावी अशी मागणी तालूका शिवसेनेतर्फे पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. गुन्हा नोंद होवून दोन दिवस झाले तरी कोणालाही अटक करण्यात आली नाही,काल दिवसभर आरोपींवर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

कर्मचारी व अधिकारी अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा होती.त्यामुळे या गुन्ह्यातील सर्व दोषींना अटक करण्याची मागणी तालूका शिवसेनेतर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर जिल्हाप्रमुख(ग्रामीण) हेमंत साळूंखे, माजी उपजिल्हाप्रमुख सर्जेराव पाटील, तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील, शानाभाऊ सोनवणे, छोटू पाटील, गिरीष पाटील, नंदकिशोर पाटील आदिंच्या सह्या आहेत.