गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या नेत्यांवर आजीवन निवडणूक बंदीची शक्यता

0

नवी दिल्ली : गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या नेत्यांवर निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी आणावी, याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 4 डिसेंबरला सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विषय गंभीर असून याचिकाकर्त्यांनी त्यांच्या मागणीवरून हटू नये, असा सल्लाही मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने दिला आहे.

अश्विनी उपाध्यायाय यांनी ही याचिका केली आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम-8(3) नुसार जर कोणाला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तर तो व्यक्ती शिक्षा भोगल्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढवू शकत नाही. यावर याचिकेमध्ये आक्षेप घेण्यात आला असून अशा व्यक्तीवर आजीवन बंदी आणावी अशी मागणी केली आहे. सरकारी अधिकाऱ्याला शिक्षा झाल्यास त्याची नोकरी कायमची जाते. मग राजकारण्यांबाबत भेदभाव का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.