गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस- नागरिकांचा संवाद आवश्यक : सदाशिव खाडे

0

महाराष्ट्र राज्य पोलीस फ्रेन्डस असोसिएशनच्या वतीने मान्यवरांचा गौरव

पिंपरी चिंचवड : संरक्षण दलातील जवान देशाच्या सीमेवर चोवीस तास कर्तव्य बजावतात, म्हणूनच सामान्य नागरिक सुरक्षित आहेत. कर्तव्य बजावताना जवान असोत की पोलीस त्यांना नागरीकांचे सहकार्य मिळाले पाहिजे. पोलीस-नागरीक संवाद गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशनची मदत पोलिसांना नेहमी होत असते. हे असोसिएशन चांगल्या प्रकारे कार्यरत आहे, असे मत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी चिंचवड येथे मंगळवारी (दि. 13) व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य पोलीस फ्रेन्डस् असोसिएशनच्या वतीने ‘शूरा आम्ही वंदिले’ कार्यक्रमात खाडे बोलत होते.

कार्यक्रमाला यांची उपस्थिती…

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा सन्मान झाला. माजी आमदार दिगंबर भेगडे, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, मेजर जनरल (निवृत्त) विजय पवार, शौर्यचक्र विजेते (निवृत्त) कमांडो मधुसुदन सुर्वे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, प्रभाकर शिंदे, प्रफुल्ल कदम, कल्याण पवार, (निवृत्त) एसीपी मनोहर जोशी, नगरसेवक माऊली थोरात, अ‍ॅड. मोरेश्‍वर शेडगे, विठ्ठल भोईर, सुरेश भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, हवेली तालुका पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, कांतीलाल काळोखे, विंग कमांडर निवृत्त शशिकांत ओक आदी या प्रसंगी उपस्थित होते.

पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा…

समाजाने पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. कर्तव्य बजावत असताना पोलिसांचे कुटूंबाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. पोलीस वसाहत समस्या, पोलिसांच्या आरोग्याच्या समस्या आहेत. सरकारने पोलिसांच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे. अशी सूचना भेगडे यांनी केली. गजानन चिंचवडे म्हणाले, प्राधिकरणाकडे भूखंड शिल्लक आहेत. प्राधिकरणाने पोलिसांसाठी त्याठिकाणी घरकुल प्रकल्प राबवावा. महाराष्ट्र राज्य पोलीस फ्रेन्डस असोसिएशनच्या माध्यमातून नागरिक आणि पोलिसांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. पोलीसांच्या कुटुंबियांसाठी राज्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम राबविल्या जात असून पोलिसांच्या कार्याची माहिती व्हावी, यासाठी शाळांमधून जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कारांचे वितरण…

यावेळी राष्ट्रपती सेवापदक विजेते मे.ज.(निवृत्त) विजय पवार, शौर्य पदक विजेते (निवृत्त) कमांडो मधुसुदन सुर्वे, विंग कमांडर (निवृत्त) शशिकांत ओक, सैन्य दलात सेवा केलेले पिता – पुत्र मधुकर सरोते, संतोष सरोते, विरपत्नी पुरस्कार – सोनाली फराटे यांना संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महादेव भुजबळ, प्राजक्ता भोसले (क्रीडाभूषण), निलेश मरळ (कार्यगौरव), प्रदीप वाल्हेकर, सत्यनजी भास्कर (समाजभूषण), संदीप राऊत, मयुर तिलवानी (उद्योगरत्न), ड. राजेंद्र मुथा, महादेव (तात्यासाहेब) गुंजाळ (शिक्षण महर्षी), तानाजी राऊत (कृषीरत्न) हेमलता काळोखे आणि कांतीलाल काळोखे यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हरिष मोरे, अतुल राऊत, प्रताप भोसले, तेजस खेडेकर, युवराज चिंचवडे, शुभम चिंचवडे, सुभाष मालुसरे, अक्षय पवार यांनी संयोजनात सहभाग घेतला. आभार गोपाल बिरारी यांनी मानले.