जळगाव। पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार कुठेही संशयास्पदरीत्या आढळून आला तर त्याच्यावर त्याच वेळी तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी शहरातील प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्यांंना केल्या. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार सांगळे यांनी पहिल्याच शनिवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 11 गुन्हेगारांची ओळख परेड घेतली.
रामानंद नगर पोलीस स्टेशनला शनिवारी शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाजयांची सांगळे यांनी बैठक घेतली. या बैठकीत गुन्हेगाराचे पूर्वीचे रेकॉर्ड, गुन्हे करण्याच्या पध्दती, सद्यस्थितीत त्यांच्या हालचाली, त्यांचे नातेवाईक, साथीदार, वकील, जामिनदार याची इत्थंभूत माहिती व प्रत्येकाची वैयक्तिक माहिती घेतली.