गुप्तांग छाटल्याप्रकरणी जखमीचा पोलिसांनी नोंदवला जवाब

0

भुसावळ- शहरातील भारत नगराजवळील रेल्वे लाईनीवर दोन संशयीतांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कलीम शहा या वृद्धाचे गुप्तांग छाटले होते तर मंगळवारी रात्री रेल्वे रूळाजवळ बेवारस गुप्तांग आढळल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी औरंगाबाद येथे जावून जखमी शहा यांचा जवाब नोंदवला आहे. रविवारी रात्री दोन संशयीतांनी दारू पिण्यासाठी शहा यांच्याकडे पैशांची मागणी केली होती मात्र पैसे न दिल्याने आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्या गुप्तांगावर वार केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी जवाब नोंदवला असून संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले.