पिंपरी-चिंचवड : भगवान महावीर जैन सेवा संघ आणि आम्ही पर्वतीकर यांच्यावतीने पुनरूत्थान समरसता गुरुकुलम् चिंचवड येथील विद्यार्थ्यांना रविवारी ब्लँकेट्स, स्वच्छता कीट व तीळगुळाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी डॉ. राजकुमार शहा, चंपकलाल शहा, डॉ. सोमनाथ सलगर, कार्यवाह अॅड. सतिश गोरडे, हास्य क्लबचे अनिल व सुनील देशपांडे, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे आणि जैन संघटनेचे पदाधिकारी व हास्य क्लबचे सभासद उपस्थित होते. हास्याचे विविध व्यायाम विद्यार्थी कडून करवून घेतले. सुत्रसंचालन आचार्य सतिश अवचार यांनी केले. चंपकलाल शहा यांनी आभार मानले.