माकर प्रतिष्ठानचा उपक्रम
सांगवी- कै. पांडुरंग धोंडीबा माकर प्रतिष्ठान व कै. शांताराम बाईत प्रतिष्ठानच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त क्रीडागुरूंचा सन्मान येथे करण्यात आला. यावेळी ओम साई फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते क्रिडा संघटक मदन कोठुळे, बॉक्सिंग कोच अजितसिंग कोचर,क्रीडा मार्गदर्शक सुरज साळुंके, क्रीडा बॉक्सिंग संदीप आतिक, क्रिडा संघटक विजय शिर्के, बॉक्सिंग कोच शेखर राव, क्रीडाशिक्षक बलभिम भोसले यांना गुरुवर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तरच खरा गुरू
यावेळी अजितसिंग कोचर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुलांना जास्तीत जास्त खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सर्व शाळेमध्ये खेळ घेऊन प्रत्येक खेळाचे कोच असणे गरजेचे आहे. मुलांचे लक्ष खेळाकडे राहील्यास वाईट गोष्टींकडे लक्ष जात नाही. खेळामधील गुरूंनी गरीब मुलांसाठी खेळासाठी देणगी आणून त्यांना सदैव मदत करावी तरच खरा गुरू होईल. यावेळी सुनिल काळे, दत्तात्रय भोसले, गुलाब अल्हाट, सागर कांबळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक माकर, रविंद्र बाईत, सदानंद साबळे, देवेंद्रसिंग यादव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सदानंद साबळे, आभार निलेश भाडाळे यांनी केले.