गुरुवारपासून गणेश व्याख्यानमाला

0

तळेगाव स्टेशन : श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे उद्घाटन तळेगाव-दाभाडे नगर परिषद नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते आज (दि.15)सायंकाळी सहा वाजता होणार आहे. तळेगाव-दाभाडे नगर परिषद विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेवक गणेश खांडगे, संतोष शिंदे, नगरसेविका नीता काळोखे, काजल गटे, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

व्याख्यानमालेत गुरुवारी जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे ’छत्रपती शिवाजी महाराज’ हा विषय मांडणार आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध कीर्तनकार डॉ.जयंत करंदीकर ’सुखी जीवनाची गुरूकिल्ली’ विषयावर बोलणार आहेत. व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प शनिवारी (दि.17) ब्रिगेडीअर (निवृत्त) हेमंत महाजन गुंफणार असून ’अशांत सीमा आणि अस्वस्थ भारत’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. श्री गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे दररोज सायंकाळी ठीक साडेसहा वाजता होणार्‍या या विनामूल्य व्याख्यानमालेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले यांनी केले आहे.