शिरपूर । अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेची राष्ट्रीय बैठक दिल्ली येथील सभापूर गाव येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी देशभरातील अठरा राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. सभेत समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच महासभेच्यावतीने वर्षभरात समाजासाठी वर्षभर राबविण्यात येणार्या कार्यक्रमांचीही माहिती देण्यात आली. या बैठकीत विविध राज्यातील प्रदेश अध्यक्षांची निवड करण्यात आली.यात महाराष्ट्रातून राज्य प्रदेश अध्यक्षपदी शिरपूर तालुक्यातील भोरटेक येथील विजयसिंग गुर्जर यांची निवड करण्यात आली.यावेळी उत्तर प्रदेशातील लोणी चे आमदार नदंकिशोर गुर्जर , वीर गुर्जर महासभेचे राष्ट्रीय संरक्षक नरेंद्र डेढा ,राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग गुर्जर यांनी विजयसिंह गुर्जर यांना प्रदेश अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली.
या निवडीबद्दल राष्ट्रीय महामंत्री गौरव तवंर, मथुरा येथील ओमसिंग गुर्जर, राष्ट्रीय सगंटन मंत्री महेश फागना,मध्यप्रदेशचे मनोज बागरे,ग्वालीयरचे गिरीराज गुर्जर , कर्नालचे रविद्र रावल,पानीपतचे सतपाल गुर्जर, अनिल गुर्जर, शिवपुरीचे सिरमानसिंह गुर्जर, राजस्थान प्रदेशाध्यक्ष मनीष गुर्जर, हरियाना प्रदेशाध्यक्ष अनिल तवंर, हिमाचलचे अनिल खेपड, पजांबचे हरप्रीत खेपड, तेलंगानाचे बहादुर गुर्जर आदींची उपस्थिती होती.