खिर्डी : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर असलेले लॉकडाऊन व संचारबंदीचे नियम लक्षात घेता सोशल डिस्टन्सचे पालन करीत मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील तुकाराम नारायण चौधरी यांची कन्या सुश्मीता हिचा विवाह तालुक्यातील पिंप्रीनांदू येथील किशोर गंभीर चौधरी यांचे चिरंजीव नयनशी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत चिंचोल (ता.मुक्ताईनगर) येथे नुकताच झाला. या निर्णयाचे गुर्जर समाजात कौतुक होत आहे.
सोशल डिस्टन्सचे पालन करीत झाला विवाह
सध्या कोरोना विषाणूच्या संचारबंदीमुळे अनेकांच्या विवाहाच्या तारखा निश्चित झाल्या असल्यातरी काहींनी विवाह धुमधडाक्यात करण्यासाठी पुढील वर्षी लग्न करण्याचे ठरविले आहे तर काहींनी ठरलेल्या तारखेस साधेपणाने विवाह सोहळा करण्याचा निर्णय घेऊन कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करून कोणताही गाजावाजा न करता हा विवाह सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे ठरवले आहे. याच पद्धत्तीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न केल्याच्या या निर्णयाचे परीसरात स्वागत व कौतुक होत आहे शिवाय गुर्जर समाजात या विवाहाने एक आदर्श निर्माण केला आहे.