जळगाव: दोन दिवसांपूर्वी राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री भाजपा खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका करत आहेत, यावर प्रतिक्रिया देतांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकीय नेते असल्याची टीका केली होती. दरम्यान यावरूनच नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अतिशय जहरी शब्दात टीका केली आहे. निलेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत २०१६ मधील एका चोरी प्रकरणात गुलाबराव पाटील यांचा सहभाग असल्याच्या वृत्ताचे ‘कटींग’ शेअर केले आहे. अतिशय अशोभनीय भाषेत निलेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.
चोर गुलाब पाटील लूच्चा लंपाट आहे… आमदार असताना चोरीच्या प्रकरणात ह्याला आत टाकला होता. गुलाब पाटील चोरांच्या यादीत तुझं नावं कसं आल रे ??? सांगून टाक… pic.twitter.com/qzF0NtPFGF
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 11, 2020
‘चोर गुलाब पाटील लुच्चा लंपाट आहे…आमदार असताना चोरीच्या प्रकरणात ह्याला आत टाकला होता. गुलाब पाटील चोरांच्या यादीत तुझे नाव कसे अआले रे??? सांगून टाक. अशा आशयाचे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
सुपारी चोर गुलाबराव पाटील मंत्री असून ह्याला कुत्रा विचारत नाही… क्वार्टर चे पैसे आमच्याकडून घेऊन जायचा हा… आता मंत्री झालाय म्हणून बाटली पर्यंत पोचला आणि क्वॉटरचे दिवस विसरला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 9, 2020
‘सुपारी चोर गुलाबराव पाटील मंत्री असून ह्याला कुत्रा विचारत नाही… क्वार्टर चे पैसे आमच्याकडून घेऊन जायचा हा… आता मंत्री झालाय म्हणून बाटली पर्यंत पोचला आणि क्वॉटरचे दिवस विसरला’ या शब्दात टीका केली आहे.