गुलामीची मानसिकता !

0

एखाद्या प्रस्तावासंबंधीची कागदपत्रे सभागृहातील टेबलावर मांडतांना मी याचना करतो (आय बेग) या शब्दांचा वापर टाळावा; कारण भारत हा स्वतंत्र देश आहे’, अशी सूचना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे सभापतीपद स्वीकारतांना केली आहे. आपल्या देशातील न्याययंत्रणा, शिक्षणप्रणाली, कायदे इत्यादी अनेक पद्धती अद्यापही ब्रिटीशकालीनच आहेत. भारतीयांच्या मानसिकतेवरही ब्रिटिशांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधी म्हणून मोठ्या जनसमुदायाचे प्रतिनिधित्व करणार्‍या खासदारांनाही लोकांनी लोकांसाठी चालवलेली पद्धत म्हणवणार्‍या लोकशाहीत सभापतींकडे ‘आय बेग’, अशा शब्दांत याचना करावी लागते. गेली हजारो वर्षे भारतात अनेक राजे होऊन गेले. ते प्रजेची पित्यासमान काळजी घेत असत. प्रजाही राजाशी तितक्याच मोकळेपणाने संवाद साधत असे. त्याच राजाकडे ‘आमच्या समस्या सोडवा’ म्हणून कुणाला याचना अथवा ‘बेग’ या शब्दांचे शब्दशः भाषांतर होणारी भीक मागावी लागत नसे.

एखाद्याला पारतंत्र्याची इतकी सवय झालेली असते की, स्वतंत्र झाल्यानंतरही त्याला तशी जाणीव करून द्यावी लागते. आपलेही तसेच आहे. भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली, तरीही मध्ये मध्ये सांगत रहावे लागते की, आता आपण स्वतंत्र झालो आहोत. कागदोपत्री स्वातंत्र्य मिळाले असले, तरी मानसिकता अद्यापही तीच आहे. ‘एखाद्या प्रस्तावासंबंधीची कागदपत्रे सभागृहातील टेबलावर मांडतांना मी याचना करतो (आय बेग) या शब्दांचा वापर टाळावा; कारण भारत हा स्वतंत्र देश आहे’, अशी सूचना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे सभापतीपद स्वीकारतांना केली आहे. आपल्या देशातील न्याययंत्रणा, शिक्षणप्रणाली, कायदे इत्यादी अनेक पद्धती अद्यापही ब्रिटीशकालीनच आहेत. भारतीयांच्या मानसिकतेवरही ब्रिटिशांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधी म्हणून मोठ्या जनसमुदायाचे प्रतिनिधित्व करणार्‍या खासदारांनाही लोकांनी लोकांसाठी चालवलेली पद्धत म्हणवणार्‍या लोकशाहीत सभापतींकडे ‘आय बेग’, अशा शब्दांत याचना करावी लागते. राजा अथवा सेनापती यांच्याविषयी आदरार्थी भावना असणे आवश्यक आहे; मात्र आपल्या समस्या सोडवण्याविषयी त्यांच्याकडे वाक्यावाक्याला याचना करावी लागणे, ही काही भारतीय संस्कृती नाही. गेली हजारो वर्षे भारतात अनेक राजे होऊन गेले. ते प्रजेची पित्यासमान काळजी घेत असत. प्रजाही राजाशी तितक्याच मोकळेपणाने संवाद साधत असे. त्याच राजाकडे ‘आमच्या समस्या सोडवा’ म्हणून कुणाला याचना अथवा ‘बेग’ या शब्दांचे शब्दशः भाषांतर होणारी भीक मागावी लागत नसे. त्यामुळे उपराष्ट्रपतींनी केलेली सूचना सर्वार्थाने योग्य असून तिचा अवलंब सर्वत्रच करणे अनिवार्य करायला हवे. मध्यंतरी ‘न्यायालयांतही न्यायाधिशांना ‘माय लॉर्ड’, ‘युवर लॉर्डशीप’ आदी शब्दांनी संबोधण्यावर प्रतिबंध घालावा’, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्याच्या सुनावणीच्या वेळीही ‘न्यायाधिशांना ‘माय लॉर्ड’, ‘युवर लॉर्डशीप’ असे म्हणणे बंधनकारक नाही’, केवळ आदरार्थी ‘सर’ असे म्हटले, तरी चालेल’, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने सांगितले होते. व्यवस्थेत होणारे हे पालट सकारात्मक आणि आशादायी आहेत. आपल्याकडे अधूनमधून कधीतरी असे चांगले काही घडत असतांना धक्कादायक मुद्देही त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात उघड होत असतात. ‘हुतात्मा’, ‘शहीद’ हे शब्द सैन्याच्या किंवा पोलीस खात्याच्या शब्दकोशातच नाहीत. त्याऐवजी सैन्यात ‘युद्धातील अपमृत्यू’, तर पोलीस दलात ‘कारवाईतील अपमृत्यू’ या शब्दांचा वापर केला जातो’, असा खुलासा संरक्षण मंत्रालयाने आणि गृहखात्याने केंद्रीय माहिती आयोगासमोर केला आहे. नुकतेच अद्यापही ‘भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना हुतात्मा असा दर्जा दिलेला नाही. भारतीय इतिहास संशोधन मंडळाच्या (इंडियन काऊन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्चच्या) वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकात भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांचा ‘कट्टरतावादी’ आणि ‘आतंकवादी’ म्हणून उल्लेख आहे’, हेही उघड झाले आहे. त्यामुळे आपली व्यवस्था स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बदलण्याचा गती फारच कूर्मगतीची आहे आणि अद्याप बरेच काही गाठायचे आहे, हेच लक्षात येते. कर्तव्य बजावत असतांना मृत्यू ओढवलेले पोलीस, युद्धात मृत्यू आलेले सैनिक यांना गौरवण्याची जुनी परंपरा भारतात आहे.

भारतियांनाही त्यांचा नितांत आदर आहे. असे असतांना सरकार त्यांचा शाब्दिक गौरवही का करू शकत नाही ? एकीकडे राजकीय उच्चपदस्थांना ‘आय बेग’ अशी याचना करावी लागते, तर जे खर्‍या अर्थाने देश आणि समाज यांचे रक्षण करतात, त्यांना साधे ‘हुतात्मा’ म्हणूनही गौरवले जाऊ नये, ही राजकारणातील प्रचंड मोठी विषमता आहे. एरव्ही समतावादाच्या नावाने गळे काढणार्‍यांना याचे कधी वैषम्य वाटत नाही. आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, हे या घटना स्पष्ट करतात. स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍यांना आतंकवादी म्हणायला, सभापतींकडे ‘याचना’ करायला, न्यायाधिशांना ‘माय लॉर्ड’ म्हणायला आपण अद्यापही ब्रिटीश मानसिकतेत का आहोत? आपला राष्ट्रीय आणि सांस्कृतिक अभिमान आपण विसरलो आहोत का? अलीकडेच चीनच्या एका विद्यापीठाने 31 डिसेंबर साजरा करण्यास प्रतिबंध केला आहे. ‘31 डिसेंबर साजरा करणे, ही भारतीय देशाची परंपरा नाही. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आत्मविश्वास वाढावा; म्हणून हे पाऊल उचलत आहोत’, असे साम्यवादी चीनमधील विद्यापिठाने म्हटले आहे. आपल्याकडे सांस्कृतिक आत्मविश्वासाची अशी चर्चा कधी होते का? तो जर जागृत असता, तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच पारतंत्र्यापूर्वीच्या सर्व भारतीय परंपरांचे पुनरुत्थान झाले असते. तेव्हाच्या भारतद्वेषी नेतृत्वाने जाणीवपूर्वक ब्रिटिशांचा अनुनय केला. तीच घोडचूक गेली 70 वर्षे आपण सारे करत आहोत. सर्वांनीच निर्धार केला, तर सर्वच क्षेत्रांत घुसलेल्या अशा चंगळवादी पद्धती बदलणे कठीण नाही. तो निर्धार करून भारतीय संस्कृती, राष्ट्रपुरुष आदी सर्वांना सन्मान प्राप्त करून देणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे.