नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रख्यात सर्च इंजिन गूगला 136 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. गूगलवर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने हा दंड लगावला आहे. या दंडामुळे गूगलला मोठा धक्का बसला असून, गूगल आयर्लंड लिमिटेड व गूगल इंडिया प्रा.लि.
यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आणि कंझ्युमर युनिटी ऍड ट्रस्ट सोसायटी(सीयूटीएस) यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. व्यवसाय करत असतांना स्वतःच्या फायद्यासाठी अन्यायकारक पद्धत वापरल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली होती. सीसीआयसमोर हे आरोप सिद्ध झाल्याने गूगलवर त्यांच्या कंपनीच्या उलाढालीच्या पाच टक्के दंड लगावला आहे.