गॅस दरवाढीचा भडका; सिलेंडरच्या दरात मोठी वाढ !

0

नवी दिल्ली: ऐन गणेशोत्सवाच्या काळात सामान्य नागरिकांना गॅस दरवाढीचा फटका बसणार आहे. आज तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १५.५० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे सामन्याचे बजेट कोलमडणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आजपासून विनानुदानित १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत ५९० रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत सिलेंडरचे दर ५४६ वरून ५६२ वर पोहोचले आहे.

ऑगस्टमध्ये या गस सिलिंडर किंमत ५७४ रुपये ५० पैसे इतकी होती. दोन महिन्यात किंमतीमध्ये झालेल्या घसरणीनंतर हे दर वाढले आहेत.