गेंदालाल मिलमधील बंद घर फोडले दोन लाखांचे दागिणे लंपास

0

मास्टर चावीने कुलूप उघडून चोरट्यांनी पुन्हा केले बंद

जळगाव- शहरातील दादावाडी येथे मोठ्या भावाकडे आई, वडीलासह दोन दिवस मुक्कामी गेलेल्या उमेश हरचंद करंदीकर रा. गेंदालाल मिल, जैन मंदिराच्या मागे याचे बंद घरातून चोरट्यांनी सहा तोळे, दोन लाखांचे सोन्याचे दागिणे लांबविल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास समोर आली आहे. बनावट चाबीने कुलूप उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. व एैजव लांबविल्यावर पुन्हा आहे त्याच पध्दतीने कुलूप लावून चोरट्यांनी पोबारा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

गेंदालाल मिलमध्ये जैन मंदिराच्या मागे बिल्डींग नं 11, रुम नं 21 मध्ये उमेश हरचंद करंदीकर हे वडील हरचंद तर आई कोकीळाबाई यांच्यासह वास्तव्यास आहेत. ते अर्थव पॅथोलॉजी लॅबवर कामाला आहे. त्यांचा मोठा भाऊ योगेश हा शहरातील खाजगी शाळेत शिक्षक आहे. त्याचा विवाह झाला असून पत्नी तसेच मुलीसह दादावाडी परिसरात राहतो. उमेशला शनिवार, रविवार सुटी असल्याने तो आई, वडीलांसह योगेश याच्याकडे गेला होता.

घरी परतल्यावर प्रकार उघड
शनिवारी उमेश भावाकडे मुक्कामी होते. सोमवारी कामावर जायचे असल्याने रविवारी रात्री जेवण करुन ते झोपण्यासाठी घरी आले. याठिकाणाहून सोमवारी ड्युटीवर गेले. व तेथून परस्पर भावाकडे गेले. तेथून आई, वडीलांसह उमेश मंगळवारी सायंकाळी गेंदालाल मिलमध्ये घरी परतले. दरवाजाला कुलूप होते तसेच लावलेले होते. त्यांनी चाबीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला. यादरम्यान पलंगावरील गादी उलटी केलेली दिसून आली. यानंतर कपाटातील तिजोरी तपासली असता, त्यातील वहिनींसह आई, तसेच लहान मुलाचे असे एकूण सहा तोळे गायब असल्याचे दिसून आले. यानंतर उमेश करंदीकर यांनी रात्री उशीरा तक्रारीसाठी शहर पोलीस स्टेशन गाठले.