गेंदालाल मिल परिसरातील तरुणाच्या डोक्यावर फोडली बाटली

जळगाव- गेंदालाल मिल परिसरात काहीही कारण नसताना एकाने तरुणाच्या डोक्यावर बिअर बाटली फोडून तोंडावर फायटर मारुन शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जखमी केले.
शंकर विश्वनाथ साबळे (वय 19, रा. गेंदालाल मिल) हा तरुण गेंदालाल मिल परिसरातील अक्षय किराणा दुकानाजवळील दिल्ली गेट जवळ 14 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास उभा होता. या वेळी रईस लाला (रा. लक्ष्मीनगर, गेंदालाल मिल) याने काहीही कारण नसताना शंकरच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली. तसेच फायटरने तोंडावर मारुन शिवीगाळ केली. यात शंकर साबळे याने खासगी दवाखान्यात उपचार घेतले. त्यानंतर त्याच्या फिर्यादीवरुन रईस लाला याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल रवींद्र पाटील करीत आहेत.