जळगाव । येथील गेंदालाल मिल परिसरात राहणार्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी 16 रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेंदालाल मिल परिसरात जितेंद्र मुरलीधर कदम (वय 34) या तरुणाने आपल्या राहत्या घरात छताच्या पंख्यास दोरीच्या साहय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत विशाल अरुण सोनवणे (रा.गेंदालाल मिल) यांच्या खबरीवरुन शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पुढील तपास पो.हे.कॉ.विकास महाजन करीत आहे.